प्रत्येकाला
कोणांना कोणाची गरज असतेच. ती गरज स्वार्थातून निर्माण होते की आपुलकीतून हे
सांगणे सोपे आहे का ? वेळेनुरूप गरजेचे वर्गीकरण केले जाते. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण मान्य
केली पाहीजे.
राग, लोभ, मद, मोह, मत्सर, आणि क्रोध वेगवेगळी रुपे मनुष्य स्वभावाचे सुरेख आणि सुंदर दर्शन घडवीतात, तितकेच मानवी मनाचे अतर्क्य आणि
गूढ असे वाटणारे मार्ग निर्माण करतात. मला आवडणारी गोष्ट दुसर्याला आवडेलच असे
गृहीत धरून चालायचे नसते.
नोकरी करताना तेथील माणसे आपली वाटतात आणि आसपासची माणसे परकी का वाटू लागली, नेहमी नेहमी येणार्या अवघड
प्रसंगांना तोंड देताना जे बरोबर आहेत त्यांच्या सोबत आपण आपले सुख: दुख: वाटून
घेतो असे आपल्याला वाटत असते पण सर्वांना असे वाटावे असे नाही . आपल्या सु:ख- दु:खा
पेक्षा बाकीचे अजून खूप भयंकर रीतीने जगतात हे पाहतो आणी आपले दु:ख खूप हलके
वाटते.
खोट कशाला खर अनुभवा आणि ठरवा रोज तुमच्या
समोर येणार्या माणसातुन तुमच्या स्वप्नात कोण येते जे तुम्हाला अनुभव येतील ते
खरे असतात. आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून चालता. गरज आहे म्हणून नोकरी
करायची, गरज संपली की सोडून द्यायची असे
माणसाचे माणसात अडकून जाणे खरोखरच वेदना देणारे असते॰ हा जन्म जन्माचा प्रघात सर्व
मानव जात अनुभवते आहे.
मोठ्या आवाजात ओरडून, रागावून समोरच्याला आपले म्हणणे
पटतेच असे नाही. आपला सर्व जन्मभराचा राग कोण्या एका माणसावर काढणे हे गैरच आहे.
त्यामुळे आपले हट्ट पुरे करण्याच्या नादात आजूबाजूच्या परिस्थीतीचा विचार माणसाने
केला पाहीजे तसे न केल्यास नुकसानीचा अंदाज घेणे शक्य होणार नाही. आपले काही दोष
नसताना आपण कशाला स्वता:चे नुकसान करायचे.
कोणते क्षण जपून ठेवायचे हे सहज ठरते . ते
क्षण जपून ठेवावेसे वाटतात. त्या क्षणांची महती शब्दात वर्णन करता येत नाही.
एकमेकांसाठी सर्वजण जीवन अनुभवतात. शब्दांच्या रूपाने भावनेला वाट मिळते. कृतीने
भावना सफल होते. त्या सफलतेत जीवनाचे सार्थक झाले असे वाटे.
|| र्स्पशाने उमलती नाती, फुलती मने, एकमेकांच्या आशा आकांशा जपल्या
जाती तेथे. परस्परांच्या भाव भावनांना दिला असे वाव तेथे सार्थक जीवन होई . ||
पैसा, माणूस, घर एकदम का चालू नये ? माणसे चमत्कारिक का वागतात ? आपला आपल्यावर विश्वास ठेवायला हवा. दुसर्याच्या मनात, दुसर्या बद्दल वाईट विचारांचा
प्रवाह निर्माण का करायचा ? माझे नियम मी ठरवीन पण दुसर्याने मला नियम घालायचे नाहीत. मी मला हवाय तसा
वागेन पण दुसर्याने वागायचे नाही. कोणाकडून घेताना छान वाटते देताना दुख: का होते ? गरीबी, श्रीमंती वातावरण विचारांनी, कृतीनी समजून येते. पैसा, प्रतिष्ठा, मान, मरातब फार पुढे जाणे या गोष्टींनी
स्वता:ला कीती विचारांनी वेढून घेणार ? समोरच्याला तू कसं वाग सांगताना त्याने मात्र आपल्याला कोणी असे सांगू नये अशा
गोड विचारात असतो. सुख: दुख: ही दाखवायची वस्तु आहे काय ? या सगळ्याला कोणाला जबाबदार धरायचे ? दुसर्याचे जगून झाले आहे तरी तो
बाकीच्यानं वेठीला धरतो . मी माझे मन कशात घालणार आणि कशातून काढून घेणार हे माझे
मी ठरवणार. चार आश्रमाच्या वर्गवारीचे वर्णन खरोखर सुरेख व योग्य मेळ मानवी
वर्तनाचा राहील असेच आहे. ज्यांच्या मुळे आपल्या वागण्यात फरक पडला ते आपल्याशी
असे का वागले ? अचानक एका दिवसात उठून मने जुळून किंवा तोडून होत नाहीत . घरातल्याना वागणूक
मुळीच चांगली देयची नाही आणि बाहेरचे मात्र गोड संबध आहेत असे घरातल्याना दाखवत
राहायचे. स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत राहण्याचे नाना प्रकार आहेत. एकमेकांवर
रागावताना ते आपले आहेत याचा विचार मनाला साधा शिवत सुद्धा नाही.
दुसर्याच्या मनाचा नको इतका विचार करणे , घरात खूप अशांतता भरून असणे घराची
भिंत आणि घराचे वासे वास्तु तथास्तु म्हणत असतात॰ एकाने जे केले ते दुसर्याने
उचलून धरले व ते योग्य असेल तर त्याचा चांगला उपयोग होतो. माणसाचे काही चुकते
म्हणून त्याला निर्णय घेता येत नाहीत काय?
नुसत्या भीतीनेच बहुधा माणसाला वाईट वाटते. जे नुसतेच एकटेच आहेत ते स्वत:च्या
कष्टावर उभे राहतात. मग नवरा बायकोपैकी एक कोणी नाही म्हणून लोक पायावर पाय टाकून
बसत नाहीत. जाणारे जातात ते गरजेचं असत. पाठीमागे राहणार्यांना हे सगळ पुढे चालवायच
असत. तेव्हा अशक्य अस या जगात काही नाही. ह्या सगळ्या विचाराच्या वावटळीत स्वत:ला
तपासून बघणे फारच आवश्यक आहे.
कोणत्याही परिस्थीतीत पाय जमीनीला टेकलेले
ठेवणे हे गरजेचे आहे. चार माणसांपेक्षा वेगळे वागलो तरच समाज विचारतो या विचारात
आपण आपले नुकसान करून घेतो.
पैसा आणि माणूस एकमेकांबरोबर चालायला हवेत.
विचारांचा गोंधळ माणसाचे वागणे यांचा मेळ घातला गेला पाहिजे. दुसरा मदत करतो
म्हणून त्याची मदत कीती घेयची रोज विचारांची क्षमता वाढवावी लागते. दुसर्याला
भांडणाचे वातावरण आवडत नसतेच त्याचा नाईलाज झालेला असतो. स्वत:सह दुसर्याचे विचार हे सकारात्मक नाहीत.
कोणावरही विश्वास दाखवायचा नाही. तिर्हाईता सारखे घरी दारी वागणे का करतात सगळेच.
उद्दामपणे वागले पाहीजे असा विश्वास आपल्यात कालानुरूप वाढत जातो. आपल्या इच्छा
विचार इतरांवर का लादायचे ? दुसर्याला भांडताना पाहून माणसाला सुख वाटते बहुधा.
खरोखरच हा संसार कीती उठा ऊठी रेटा रेटी
करून चालवत असतात. त्या सगळ्यात नेमके काय आणि कसे साध्य करायचे असते ते ज्याचे
त्यानेच ठरवून टाकलेले असते। परंतू हे सगळे आपल्या मनाप्रमाणे घडले तर काय भारी
होईल. पण ईश्वरेच्छा बलियसी म्हणत सगळे वरच्यावर ढकलून टाकले की आपली जबाबदारी
संपली अशी सोयीस्कर व्यवस्था माणसाने आपल्या बाजूने करून ठेवली आहे.
परिस्थितीचा नियमीतपणे हे हादरा कमी
जास्त असतोच त्याच्यामध्ये अस बाऊ करण्यासारखे काही नसते पण त्या त्या
परीस्थीतीतून बाहेर पडल्यावर असे वाटते हे खूप भारी आहे ना. होणारे मनस्ताप, कुटुंबाकडे केलेले कालानुरूप
थोडेसे दुर्लक्ष, नाईलाजमुळे हे कधी कधी कुटुंबियांच्या दृष्टीने खरच मनस्ताप देते.
जेव्हा मनात विचारांचा गोंधळ होतो तेव्हा ते
कसे थांबवायचे हे आपल्या मनाला कसे समजावायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
देवांच्यावर जास्त भार टाकायचा की त्याने दिलेले सुंदर अवयवांचे योग्य मन राखत
त्यांचा उत्तम उपयोग करून घेयचा की देव आहे आणि असेल तर त्याला हे सर्व आवडेल अशी
मनाची समजूत घालायची. विस्कटली कालानुरूप घडी कुटुंबाची तर त्याला कसे सावरायचे.
झोपले तर विचार काय संपतात काय? ते तर अजून जोरात धावत असतात. जशी
विचारांची मोट बांधायचे आपण ठरवतो तसे ते जास्तच भरकटत जातात. मला एखादी गोष्ट करू
नको सांगितले की मला ती हमखास करावी असेच वाटत राहते . मन हे खूप ओढाळ आहे. त्याचा
वावर मोठा असतो. केव्हा कसं आणि कधी हे मन धावेल ते अजून कुणाला निश्चित सांगता
आलेले नाही.
इच्छा पूर्ण न होणे म्हणजे काय सगळे आयुष्य
संपते की काय? पत्त्यांचा बंगला आपण लहानपणी बांधत असतो व तो हलकेपणामुळे कोलमोडतो हे साधे
आणि सोपे असे हे सर्वसामान्य जगण्याचे सूत्र आहे. रोज नवी आव्हाने येतात आणि ती
पेलायचे सामर्थ्य आपण आतून बाहेरून उभे करायचे असते . भांडवल म्हणजे नक्की काय हे
ज्याला समजले त्याला हे जग दाही दिशांनी खुणावत असते.
मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे जर आधीच
माहीत झाले तर मला काय किंवा तुम्हाला हे सगळे नीरस वाटेल. त्या करिता तुम्ही
तुमचा शोध घेणे आवश्यक जरी असले तरी
तुम्ही कष्टाची साथ सोडणे हे कधीच योग्य होणार नाही. हे तुमचे तुम्हालाच समजून
सांगायचे असते .
सगळे असे मस्त उधळत असतात. पण आपल्या मनाला
घातलेली बंधने आपण योग्य वेळी बाजूला सारून योग्य वेळी त्यांचा वापर करून आपले
आयुष्याचे वारू पुन्हा पुन्हा योग्य मार्गावरून पुढे घेऊन जाणे महत्वाचे असते.
आपण दुसर्याला जास्त बंधनात अडकवून ठेवतो
काय, त्यामुळे त्याला त्याचे निर्णय
घेता येत नाहीत असे वाटले तर ते योग्य आहे. आपण कामात असलो की आपोआप दुसर्यासाठी
लक्ष ठेवण्याचे काम कमी होते. मला काय आवडते आणि काय नाही हे मी नेमके ठरवेपर्यंत
पुढचे सुंदर आयुष्य पुढे निघून गेलेले असते. बी कॉम होऊन स्वयंपाक करणे घरची, कामे दादागिरी करीत सगळ्यांकडून
करून घेणे हा प्रचंड मोठा कामाचा भाग होऊन जातो. माझे मीच काय काय म्हणून स्वत:ला
कामात गुंतवून ठेवायचे याचा विचार जरी केला तरी तसे खूप प्रकार समोर येतात.
पैसे कोणीही कमवू शकते . पण त्या पासून मिळणारा आनंद कीती आणि कोणी कसा घ्यायचा याच्यावर सगळे अवलंबून असलाच हवे का? मला आवडत नाही, मला पसंत नाही म्हणून येणे रोजचे संधीचे दार मी बंद करून टाकले तर कोण रोज प्रयत्न करणार, माझे मलाच हे दार उघडायला हवे आहे. लिखाण करताना सहजच खूप सुचत असते तेव्हाच तुम्ही लिहीलेत तर ते जास्त योग्य होते.
एकटे असणे काय असते हे घरी राहीले तरी चांगलेच कळते. माणसाला कोणाशी तरी
बोलायचे असतेच. पण जर आपण घरीच एकटेच बसून राहीलो तर हे कसे शक्य असते . कोणाशीही
घरात आपण जमवून घ्यायला तसे सहसा तयार होत नाही. हा मनुष्य स्वभाव असेल त्याला
कोणीच नाकारणार नाही.
पण
हे खूप भयंकर आहे . कामात कीतीही मन घातले तरी उरल्या वेळेचे काय? हा प्रश्न आहेच. सकाळी पासून झोपे
पर्यन्त कामाची खूप सारी आखणी झालेली असते. प्रत्यक्षात कीती काम आपण करतो ते
आपल्याला माहीत असते.
आपला स्वभाव , बाजुची परीस्थीती एकट राहण्यासाठी
करणीभूत असते. नोकरी करताना असणारा गोतावळा एकदम माणसाला निवृत्तीनंतर एक मोठी
पोकळी स्वत:च्या जगात निर्माण कारला मदत होते. खर तर आता स्वत:च अस राहून गेलेले
सगळे प्रसंग, घटना, करून बघायच्या असतात पण पैसे, तब्येत, इच्छा, या गोष्टींच्या त्रिकोणात माणूस कधी सापडतो ते त्यालाच काळात नाही.
आपण
ज्या प्रश्नांकडे बघू त्या प्रशनातील तीव्रता जाणवत जाते. रोज पेपरला प्रेरणादायी
घटना दिल्या तर बहुधा पेपर खपणार नाहीत. या भीतीने ते चमचमीत बातम्या छापतात जेणे
करून लोकांना त्या वाचता येतील व पेपरचा खप वाढेल.
शिक्षण
पूर्ण होताना नोकरीची जेवढी ओढ बाकीच्यानी लावलेली असते त्याच्या एक अंश सुद्धा
निवृतीनंतर उत्साह गोळा करून चालायच म्हंटल तर २० , २१ वर्षाचे असताना असलेला उत्साह केव्हा कुठे
कसा गडप होतो ते नोकरी करणार्यांनाच
ठाऊक.
गरज
म्हणून नोकरी की चैन म्हणून नोकरी हे ठरवताना ते व्यसन कधी बनले हे कळेपर्यंत
पूलाखालून बरेच पाणी गेलेले असते. या
व्यसनाच्या भोवर्यात आपण कधीपासून गुरफटलो गेलो हे ही स्मरण शक्तीला ताण देऊन
आठवावे लागते.
नोकरी
केली नाही तर रोजचे होणारे नवे नवे खर्च कोणी भागवायचे? नुसते दूध , दही याचा विचार जारी केला तरी मनाचा थरकाप
उडतो. स्वत:ला तंदुरुस्त ठेवताना स्वत:कडे
केलेले दुर्लक्ष काळाच्या ओघात मोठा राक्षस बनून आपल्या समोर येतो व हेच खूप
त्रासदायक असते.
निवृतीनंतर
काय काय करणार आहोत याची केलेली उजळणी आठवताना परत कामासाठी जायला सुरुवात करावी
असे वाटू लागते.